महाराष्ट्र शासनाचा अपंग सेवा पुरस्कार प्राप्त तसेच रोटरी क्लब ऑफ अमरावती द्वारा पुरस्कृत

दि डेफ अँड डम्ब रिलीफ असोसिएशन द्वारा संचालित

(Reg. No. RCI०७३७/F५७० Amravati)

श्री बुलिदान राठी मुकबधीर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय

अपंग व्यक्ति अधिनियम १९९५ नोंदणी क्र . ०२७३

साई नगर, अमरावती

www.dadraamt.in
dadraamravati@gmail.com
०७२१-२५१०९९७
✨ प्रवेश प्रक्रिया सुरु... ✨     ✨ इयत्ता ८ वी पर्यंत मोफत प्रवेश... ✨

एकुण विद्यार्थी संख्या : २२७

संस्थेचा व्हिडिओ

संकल्प


दिव्यांगांना आधार द्यायचा आहे ....
यांच्या जिवनात वसंत फुलवायचा आहे ....
भुतलावर दात्यांची वान नाही ....
ह्या बालकांचा ज्ञानोदय करायचा आहे ....


संस्थेचे वैशिष्ट्ये

शासन मान्य अनुदानित १०० विद्यार्थी
विना अनुदानीत १२७ निवासी विद्यार्थी
तीन भव्य सर्व सुविधायुक्त वास्तु
प्रत्येक मुलाला डीजीटल श्रवण यंत्र
डीजीटल क्लासरूम, इअरमोल्ड लॅब
कॉक्लीयर इम्प्लांट व स्पिच थेरपी
बालवर्ग ते १२ वी पर्यंत शिक्षण
प्रशिक्षीत शिक्षक व सेवाभावी कर्मचारी
व्यावसायीक प्रशिक्षणाची सोय
इंग्रजी टायपींग, संगणक प्रशिक्षण
वाचा उपचारासाठी ध्यनीविरहित कक्ष
गृप हिअरिंग व इंडक्शन सिस्टिमची व्यवस्था

वसतीगृह

२२७ विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था
लहान मुलांसाठी विशेष काळजी वाहक
पौष्टीक, रुचकर, आरोग्य वर्धक भोजन
संस्कारक्षम आनंददायी वातावरण
नियमित वैद्यकिय तपासणी व उपचार
सोलर वॉटर हिटर व वॉटर कुलर
निवासी अधिक्षीका
सौ. मोहना पुसदकर
सौ. मोहना पुसदकर
(निवासी अधीक्षिका)
(०७२१-२५१०९९७)

संस्थेचे उपक्रम

श्री बुलिदान राठी मुकबधीर विद्यालय
कर्णबधीर कनिष्ठ महाविद्यालय
कर्णबधीर कन्या छात्रालय
मुकबधीर मुलांचे वसतीगृह
कॉकलियर इंप्लांट व स्पिच थेरपी

संस्थेच्या प्रगतीत मोलाचे सहकार्य


मुकबधीरांचे शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसनाचे स्वप्न साकारण्याकरिता रोटरी क्लब ऑफ अमरावती चे स्व. हंसराजभाई शाह व डॉ. रतनलालजी चांडक यांनी संस्थेची स्थापना १९७३ साली केली व श्री बुलिदान राठी ट्रस्ट, बनोसा यांच्या सहकार्यातून श्री बुलिदान राठी मुकबधीर विद्यालय सुरु करण्यात आले. यांच्या प्रयत्नाने विद्यालयाचे नाव रूपास आले आणि ७ वी पर्यंत शाळा सुरु झाली.

स्व. छगनलालजी चुडीवाले यांनी संस्थेस १०,००० चौ. फुट भुखंड दान दिला. स्व. शंकरलालजी राठी, वालगांव यांनी शाळेच्या जुन्या इमारतीसाठी सहकार्य दिले. विद्यार्थ्यांकरीता १६ खोल्या बांधलेली अनंतवाडी येथील वास्तू डॉ. सत्यनारायण कासट आणि कासट परिवार यांनी स्व. हिरालालजी काराट यांच्या स्मृतीत संस्थेला अत्यल्प दरात दिली.

स्व. डॉ. गणेशजी बूब यांच्या अध्यक्षते खाली १९९२ ते २०१९ या कालखंडात संस्थेने खूप प्रगती केली आणि त्याचीच प्रचिती म्हणजे आज बालवर्ग ते १२ वी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

श्री रंगनाथ श्री चांडक ट्रस्ट तर्फे स्व. कांतादेवी श्रीरंगजी चांडक स्मृती भवनाकरीता अनुदान मिळाले. नवीन सुसज्ज वास्तु, “पद्म-प्रकाश कोठारी सदन" च्या बांधकामासाठी श्री प्रकाशचंद्रजी कोठारी यांचे योगदान मिळाले. आय. एम. जाजोदिया डि. एड. कॉलेज करीता इंद्र कुमार मधुसुदन जाजोदिया फॅमिली ट्रस्ट यांच्या तर्फे योगदान मिळाले.

कक्ष बांधकामाकरीता स्व. शंकरलालजी लड्ढा, स्व. मदनलालजी खंडेलवाल, स्व. हरिप्रसादजी लड्ढा, स्व. लिलादेवी बूब, स्व. सायली गावपांडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ देणगी प्राप्त झाली. ॲड. आर. बी. अटल यांचे स्व. प्यारीबाई अटल अपंग कर्मशाळेकरिता आर्थिक योगदान लाभले.

राठी परिवार, तिवसा यांचे कडुन स्व. नवलकिशोर एवम् स्व. कांतादेवी राठी स्मृती रंगमंचा साठी आर्थिक योगदान मिळाले. भोजन कक्षाकरिता पुरुषोत्तम मुंधडा व क्रीडा साहित्याकरिता विशाल राठी इ. यांच्या कडून अनुदान मिळाले.

रोटरी क्लब ऑफ अमरावतीचे संस्थेला सदैव पाठबळ लाभले. विविध प्रकल्पासह पुनर्वसन, प्रशिक्षण केंद्रासाठी रोटरी इंटरनॅशनल द्वारा ग्रॅन्ट मिळाली.

सामाजीक न्याय मंत्रालय, महाराष्ट्र शासन, महानगर पालीका अमरावती, असंख्य दानदाते व आश्रयदाते या सर्वांची संस्था आभारी आहे.

आज डॉ. राजेश बुब यांच्या अध्यक्षतेखाली संस्था प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

— श्री अजय हेडा
सचिव

मनोगत


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांची कर्मभुमि आणि अंबामाता व एकवीरादेवीच्या अंबानगरी मध्ये ५० वर्षापुर्वी ७ विद्यार्थ्यांना घेवून कर्णबधीरांच्या शिक्षणाचे रोपटे लावण्यात आले. त्यांचे आज भव्य वटवृक्षात रूपांतर झाले आहे.

या वृक्षाचे पारंब्यांवर बेभान व आनंद विभोर होवून झोके घेणारी ही मुकबधीर बालके स्वावलंबी व्हावीत व स्वाभीमानाने जगावित हा उद्देश आहे.

त्यासाठी त्यांचे अध्यापन, पुनर्वसन व रोजगार निर्मिती करीता झटणारी विदर्भातील ही ख्यातनाम सेवाभावी संस्था मायेची सावली ठरत आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

— डॉ. राजेश बुब
(अध्यक्ष)

नम्र निवेदन

अत्यल्प आय, मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातुन आलेल्या मुकबधीर मुला-मुलींचे पुनर्वसन व रोजगार कार्यात संस्थेस तन-मन-धनाने सहकार्य करावे.

“संस्थेस एकदा सदिच्छा भेट द्यावी हिच मनोकामना”

- स्व. डॉ. गणेशजी बुब

कार्यकारीणी

डॉ. राजेश बुब
डॉ. राजेश बुब
(अध्यक्ष)
श्री अनिल सिकची
श्री अनिल सिकची
(उपाध्यक्ष)
श्री अजय हेडा
श्री अजय हेडा
(सचिव)
श्री रजनिश कोठारी
श्री रजनिश कोठारी
(सहसचिव)
श्री अशोक असोरिया
श्री अशोक असोरिया
(कोषाध्यक्ष)
डॉ. नविन हंतोडकर
डॉ. नविन हंतोडकर
(सदस्य)
डॉ. विजयकुमार भांगडीया
डॉ. विजयकुमार भांगडीया
(सदस्य)
ॲड. रितेश बुब
ॲड. रितेश बुब
(सदस्य)
श्री प्रमोद कासट
श्री प्रमोद कासट
(सदस्य)
सौ. शितल राठी
सौ. शितल राठी
(महिला प्रतिनिधी)
(सदस्या)

ट्रस्ट प्रतिनिधी

श्री प्रकाश राठी
श्री प्रकाश राठी
(श्री बुलिदान राठी, बनोसा)
डॉ. स्मिता हंतोडकर
डॉ. स्मिता हंतोडकर
(प्रतिनिधी रोटरी क्लब, अमरावती)
श्री पुरुषोतम मुंधडा
श्री पुरुषोतम मुंधडा
(डी. डी. सिकची प्रा. ट्रस्ट, अमरावती)
श्री रंगनाथ चांडक
श्री रंगनाथ चांडक
(श्री रंगनाथ चांडक एच. यु. एफ. ट्रस्ट, अमरावती)
कु. वृंदा अटल
कु. वृंदा अटल
(सी. ए.)
(श्रीमती प्यारीबाई अटल चॅरिटेबल ट्रस्ट, अमरावती)

संपर्क

डॉ. राजेश बुब
डॉ. राजेश बुब
(अध्यक्ष)
९८९००३३९४४
श्री अजय हेडा
श्री अजय हेडा
(सचिव)
९४२२१५५७३६
श्री अरविंद राऊत
श्री अरविंद राऊत
(प्राचार्य)
९४२०३६३६७७
श्री प्रविण देशपांडे
श्री प्रविण देशपांडे
(वाचा उपचार तज्ञ)
९३७१५९४८७५

Google Map